Internet Over Internet
इंटरनेटचे जाळे झाल आता जीवन आपलं ऑनलाइन माझी कविता सुद्धा ऑनलाईन आवडली तर लाईक करा ऑनलाईन आणि share पण करा ऑनलाईन करतो आपण गुगल सर्च त्याचं सर्वर आहे अमेरिकेला तरीपण होतो लोड काही सेकंदात पण आपली माणसे आपल्या सोबत असतात ती लांब का वाटतात कारण आपलं नातं असतं फक्त ऑनलाइन बोलायचं असेल तर आपण मेसेज करतो बघायचं असेल तर आपण व्हिडिओ कॉल करतो. कसे आहात असं ऑनलाइन विचारतो कधी ऑफलाईन राहून त्या व्यक्तीशी भेटून बोलून तरी पहा. इंटरनेटचा वेग कमी झाला कारण ऑनलाईन लोक जवळ आली. तो सर्व्हर हँग होतो कारण सर्व जण त्याचा वापर करतात. दोन किंवा जास्त मोबाईल किंवा दोन किंवा जास्त कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट झाल्यानंतर इंटरनेट चे जाळे तयार होते. दोन किंवा दोन पेक्षा जास्त माणसांना माणुसकीने जोडणार माणुसकीचं जाळे कधी तयार होणार? आपण ऑफलाईन राहुन माणुसकी चे नातं ऑनलाईन यायला पाहिजे.